|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » leadingnews » व्हीआयपींच्या वाहनांवरील लाल दिवा जाणार !

व्हीआयपींच्या वाहनांवरील लाल दिवा जाणार ! 

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली :

प्रत्येक मंत्र्याला किंवा अधिकाऱयांच्या दिमतीला असणाऱया वाहनांवरील लाल दिवा आता कायमचा हद्दपार होणार असून, याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र राष्ट्रपती, पंतप्रधानांसह इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांवरील लाल दिवा कायम राहणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 1 मेपासून होणार आहे.

आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. उपराष्ट्रपती, राज्यसभा अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष, भारताचे सरन्यायाधीश, राज्यपाल आणि मुख्यमंत्री या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांवरील लाल दिवा कायम राहणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रासह इतर राज्यातही हा नियम लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनीदेखील काही दिवसांपूर्वी वाहनांवरील लाल दिवा काढण्याचे आदेश दिले होते. त्यापाठोपाठ आता केंद्रानेही हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक मंत्री, प्रशासकीय अधिकाऱयांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

Related posts: