|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मडगावात 6 फ्लॅट फोडले, लाखोंचा माल लुटला

मडगावात 6 फ्लॅट फोडले, लाखोंचा माल लुटला 

मडगाव :

आके -मडगाव येथे एकाच रात्री 6 फ्लॅट फोडून चोरांनी गोवा पोलिसांना जणू आव्हानच दिले. या चोरीत सुमारे 5 लाखाहून अधिक रकमेचा ऐवज लुटला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. टेहळणी आणि अभ्यास केल्यानंतरच हे फ्लॅट फोडलेले आहेत हे लक्षात येते. या कॉलनीत राहणाऱया एका मुलाने चोरांना पाहिलेले आहे. मात्र चोरांनी डोक्यावर टॉवेल टाकून चेहरा लपवला होता.

आके -मडगाव येथील इलेक्ट्रीसिटी कॉलनीमध्ये राहणारे साहाय्यक लायनमन नागराज पिरप्पा आंगुडी (28) यांनी या चोरीप्रकरणी मडगाव पोलिसांना माहिती दिली. बुधवारी 19 रोजी मध्यरात्रीनंतर ही चोरी झाली. नागराज यांचे वडिल एका लग्नासाठी बेळगाव गेले होते. घरात त्यांचे दोन मुलगे होते. मोठा नागराज व दुसरा लहान मुलगा. घरात एकटाच राहण्यास तो धजावला नाही म्हणून तो आपल्या मित्राच्या घरी गेला आणि रात्री 2 वाजण्याच्या सुमाराला आपल्या क्वॉटर्सवर परतत होता.

चोराने चेहरा टॉवेलने झाकलेला

इतक्यात डोक्यावर टॉवेल घालून एक व्यक्ती जात असल्याचे त्याने पाहिले. मात्र, त्याच दिवशी त्यांचे एका युवकाशी भांडण झाले होते आणि त्या युवकाने आपल्याला मारहाण करण्यासाठी कोणाला तरी पाठविले असावे, असे त्याला वाटले. मात्र थोडय़ा वेळाने डोक्यावर टॉवेल घातलेल्या त्या व्यक्तीने दगड फेकण्यास सुरुवात केली. त्यातील एक दगड या मुलाच्या पाठीवर बसला. त्यानंतर तो मुलगा जेव्हा आपल्या क्वॉटर्समध्ये गेला आणि जेव्हा चोरी झाल्याचे त्याला समजले तेव्हा त्यांनी मडगाव पोलिसांना फोन केला आणि माहिती दिली अशी सुत्रांनी माहिती दिली.

दोन लाखांचा ऐवज लुटला

अज्ञात चोरांनी आंगुडी यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि रोख 1,80,000 रुपये तसेच चांदीचा एक दागिना मिळून सुमारे 1,85,000 रुपयांचा ऐवज लंपास केला.

Related posts: