|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नरेंद्र नाही तर अविनाशही नाही

नरेंद्र नाही तर अविनाशही नाही 

सोलापुर/ वार्ताहर 

     महापालिका निवडणुकीत नरेंद काळै यांचा जावई या नात्याने सहकारमंत्र्यांनी पत्ता कट केला. त्यानंतर हायसे समजुन सहकार मंत्री गोटाने फिटट्मफिट केली. पण त्यानंतर अजुन खरी लढाई सुरु झाली. पालकमंत्र्यांनी संयमी राजकारण खेळत या घटनेचे चोख उत्तर देत दोन्ही आपलेच गडी बसविले. नरेंद्र नाहि तर अविनाश ही नाही असाच संदेश या निवडीने दिला आहे.

    महापालिकेत गुरुवारी स्विकृत सदस्यांची निवड झाली. या निवडीने खास करुन भाजपमधील म्यान झालेली देशमुखी पुन्हा उफाळुन आली. यामुळे एकंदरित सोलापुरकरांनी या कुरघोडीच्या नादात विकास मागे पडणार नाहि ना? अशी शंका व्यकत केली आहे. हे वाद यापुढे थांबण्याचे नाव घेत नसुन सोलापुरकर मात्र या चढाओढीच्या राजकारणात विकासाची अपेक्षा करत आहेत तो सार्थ ठरावा.

 कुरघोडीचे राजकारण हे सर्वच पक्षात असते. पण भाजपमधील हे राजकारण सत्ता काबीज केल्यानंतर ज्यादाच उफाळुन आले आहे. देशमुखी गटबाजी नसल्याचा दावा सहकारमंत्री देशमुख यांनी केला. पण महापालिकेच्या प्रत्येकी घडामोडीत हि देशमुखी गटबाजी उफाळुन येत आहे. 

 स्विकृत नगरसेवक पदी भाजपच्या वाटयाला दोन जागा आल्या होत्या. त्यानुसार पालकमंत्री देशमुख आणि सहकारमंत्री देशमुख यांच्या प्रत्येकी एका सदस्याची निवड होणार अशी चर्चा, शकयता वर्तवली जात होती. पण महापालिका निवडणूकीतील घडलेल्या नाटयमय घडामोडी लक्षात घेता पालकमंत्री गटाने आपले दोन गडी स्विकृत करत चांगलीच चाल खेळली.

 मालक गडाकडुन वानकर आणि प्रभाकर जामगुंडे यांची नावे होती. तर सहकारमंत्री गटाचे अविनाश महागावकर यांचे नाव होते. पण निवडीपुर्वी तिनही जणांचे अर्ज भरले होते. त्यानंतर निवडीवेळी सहकारमंत्र्यांनी अटिकाट प्रयत्न केले पण सभागृहनेते सुरेश पाटील यांच्या हटट्पुढे महागावकर यांची मोठी परिक्षा झाली. पालकमंत्र्यांच्या या खेळीने सहकारमंत्र्यांची खेळी अयशस्वी ठरली. एकुणच पाहता माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे यांना बाजुला सारणे सहकारमंत्री हटाला विशेषत: अविनाश महागावकर यांना अंगलट आले. आता हे युदध् या फिटट्मफिटट्वीर पालकमंत्री गटाने संपवले. 

 वानकर यांना तीकिट न देता स्विकृत करण्याचा शब्द दिला होता त्याप्रमाणे त्यांना सदस्य केले. पण दुसऱयाजागी सहकारमंत्र्याचे निकटवर्ती अविनाश महागाकर यांच्या तुलनेत प्रभअकर जामगुंडे यांचे पक्षातील योगदान हे महत्वाचे आहे. याची तुलना करतच प्रदेशाकडे पालकमंत्री गटाने आपले पारडे जड केले. त्यात शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांची तर सभागृह नेत्यांनी धोबी पछाड केली.

 मनपाच्या कोणत्याहि नेमणुक निवडीत दक्षिण उत्तर टोक पहावयास मिळते. त्यानुसार दोन्ही मंत्र्यांना समान न्याय हेच समीकरण समजले जाते. दरम्यान दोघांनाही आपलेच वर्चस्व कायम ठेवायचे असल्याचा प्रयत्न त्यांच्याकडुन केला जातो. कधी शहर तर कधी जिल्हयाच्या राजकीय पटलात हे वारंवार जाणवते. सर्वच निवडणुका चुरशीच्या करुन त्या जिंकायच्या एवढया समिकरणाने भाजपची ताकद वाढली तशी त्यांच्यातील वर्चस्वी झुंजही अधिकच उफाळुन आली. एकीकडे हा वाद दिसत असला तरी पक्षाच्या वाढत्या बळाने वादाला पांघरुण पडते. त्यासह विकासाला बाधा येऊ नये एवढीच माफक अपेक्षा जनता करत आहे.

 येणाऱया काळात या देशमुखी वादाचा परीणाम शहराच्या विकासावर होऊ नये अशी अपेक्षा सोलापुरकर करत आहेत. काँग्रेसला पर्यायी म्हणून भाजपला साथ दिल्यानंतर या सोलापुरकरांना भाजपचा वीट येऊ नये अशी अपेक्षा आहे. 

Related posts: