|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोव्यात आता सवलतीच्या दरात मासे मिळतील

गोव्यात आता सवलतीच्या दरात मासे मिळतील 

प्रतिनिधी/ पणजी

गोमंतकीयांना लवकरच सवलतीच्या दरता मासे मिळण्याची व्यवस्थात करणयात येणार असल्याचे मच्छिमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी सांगितले. गोवा मच्छीमार महामंडळाची स्थापना करून त्यांच्या अंतर्गत सवलतीच्या दरात मासे उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. याबबात आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तसेच गोवा फॉरवडचे प्रमुख विजय सरदेसाई यांच्याशी बोलणी करणारा असल्याचे पालयेकर म्हणाले.

मच्छिमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी काल शुक्रवारी मच्छीमार कार्यालयाला भेट देऊन पहाणी केली यावेळी त्यांच्यासोबत काही अधिकारी उपस्थित होते. नंतर त्यांनी पत्रकार परिषेद घेऊन वरील माहिती दिली.

पुढे बोलताना पालयेकर म्हणाले की राज्यातील मच्छिमार लोकांचे हित जपण्यास आपण प्रधान्य देणार आहे. पावसाळी हंगामात 1 जून ते 31 जुलैपर्यंत मच्छीमारांना समूद्रात जाण्यास बंदी असेल. मच्छिमार लोकांना आपल्या ट्रॉलर बदलण्यास मान्याता देण्यात येणार असून दरवर्षी केवळ 35 ट्रॉलर बदलले जातील प्रथम येणाऱयास प्रथम संधी दिली जाईल. मच्छिमार लोकांच्या बोटीचा रंग समान असणे बंधनकारक राहिल. सुरक्षेच्या दृष्टीने हे फार महत्वाचे ठरले नव्याने मच्छिमार व्यवसायात येणाऱयांना युवकांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल असेही पालयेकर यंनी सांगितले.

राज्या पर्यटक मोठय़ा प्रमाणात येत असून पाण्यातील खेळातून युवकांना व्यवसाय मिळणार आहे. म्हणून अधिकाधिक पाण्यातील खेळांसाठी (वॉटर स्पोर्टस्) परवाने देण्यात येणार आहे. असे ही पालयेकर यांनी सांगितले.

 

Related posts: