|Saturday, February 22, 2020
You are here: Home » Top News » दिल्ली महापालिका निवडणूक ; 24 टक्के मतदान

दिल्ली महापालिका निवडणूक ; 24 टक्के मतदान 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्ली महानगरपालिकेसाठी मतदानास सुरुवात झाली असून, या मतदानाची मतमोजणी येत्या 26 एप्रिलला होणार आहे. आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या पक्षांमध्येच मुख्य लढत पाहायला मिळत आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत 24 टक्के मतदान पार पडले.

महापालिकेच्या या निवडणुकीसाठी जवळपास 1 कोटी 32 लाख मतदार असून, 2315 उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. दिल्लीतील जामिया नगर, संगम विहार, सीमापुरी, सीलमपूर, तुघलकाबाद, सल्तानपुरी आणि संगम विहार या भागातील 1468 मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहेत. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत राबवण्यासाठी 1 लाख कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकांचे निकाल येत्या 26 एप्रिलला होणार आहे.

Related posts: