|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अहवाल मागवून करणार कारवाई : सिद्धरामय्या

अहवाल मागवून करणार कारवाई : सिद्धरामय्या 

प्रतिनिधी/ बेंगळूर

झुंजरवाड येथे कूपनलिकेत सहा वर्षीय मुलगी पडल्यासंबंधी अहवाल मागवून कारवाई हाती घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. रविवारी राष्ट्रपती भवनमध्ये पार पडलेल्या नीती आयोगाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. निरुपयोगी कूपनलिका बुजविण्याचे आदेशही दिले होते. मात्र, ही कूपनलिका बुजविण्यात आली नाही. त्यामुळे प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.