|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सेझा गोवा ट्रक असोसिएशनच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा

सेझा गोवा ट्रक असोसिएशनच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा 

प्रतिनिधी/ कुडचडे

गोंयचेमळ – सावर्डे येथे रविवारी घेण्यात आलेल्या सेझा गोवा ट्रक असोसिएशनच्या बैठकीत महत्त्वाच्या दोन मुद्यांवर चर्चा करण्यात आली. शेवटी आज सोमवार 24 रोजी सकाळी 7.30 वा. आपला निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व ट्रकमालकांनी कंपनीच्या ठिकाणी एकत्र यावे, असा निर्णय घेण्यात येऊन तसे आवाहनही संघटनेचे अध्यक्ष वल्लभ दळवी यांनी केले.

संघटनेच्या नव्याने नियुक्त केलेल्या समितीच्या अनुषंगाने कंपनीला प्रस्ताव देण्यात आलेला आहे. मात्र पंधरा दिवस होत आले, तरी कंपनी मान्यता द्यायला विलंब लावत आहे, असे या बैठकीत बोलताना दळवी यांनी सांगितले. दुसऱया मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, कंपनी प्रत्येक दिवशी ट्रकांची माल भरण्याची जागा बदलत असून त्यामुळे जो दर आणि जे इंधन देण्यात येत आहे ते अजिबात परवडत नाही. शनिवारी कंपनीत माल भरण्यासाठी रांगेत असलेल्या चारशेहून अधिक ट्रकांनी माल न भरताच आणि ट्रक कंपनीतच ठेऊन चालकांनी बाहेरची वाट पकडली. बैठकीत या दोन्ही मुद्यांवर चर्चा झाल्यावर शेवटी वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला.

Related posts: