|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शिवकालीन युध्दकलेच्या प्रात्यक्षिकांनी शिवोत्सवाला प्रारंभ

शिवकालीन युध्दकलेच्या प्रात्यक्षिकांनी शिवोत्सवाला प्रारंभ 

मिरजकर तिकटी चौकात  जिल्हय़ातील चौदा आखाडय़ांनी सादर केली मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शिवकालीन युध्दकलेच्या प्रात्य†िक्षकांच्या सादरीकरणाने शिवोत्सवाला रविवारी प्रारंभ झाला. मर्दानी खेळाच्या सादरीकरणामध्ये 14 आखाडय़ांच्या सुमारे 90 मावळे व रणरागिणींनी सहभाग नोंदविला होता. त्यांनी सादर केलेल्या चित्तथरारक मर्दानी खेळाच्या प्रात्य†िक्षकांनी उपस्थितांना थक्क करायला लावले. मंगळवार पेठेची शिखर संस्था असलेल्या राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त रविवार (23) ते शुक्रवार (28) एप्रिल या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिवजयंती उत्सवाला रविवारी सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. मावळे व रणरागिणींनी पारंपरिक वेशभूषेत मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. या प्रात्यक्षिकांमध्ये त्यांनी लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टय़ाने, डब्बल काठी, दोरी बंदाटी, डब्बल पट्टा, डोळे बांधून दांडपट्टय़ाने लिंबू व नारळ उडविणे आदी प्रात्य†िक्षकांचे सादरीकरण करून उपस्थितांना थक्क करायला लावले. तसेच खंडोबा तालमीच्या मावळय़ांनी वीटा फेक, डोक्याने नारळ फोडणे, बाणफेक आदी मर्दानी खेळांची लक्षवेधी प्रात्यक्षिके सादर केली. यानंतर ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेचे स्क्रीनवर प्रक्षेपण करण्यात आले. यामध्ये शिवजन्मापासून विविध ऐतिहासीक प्रसंग दाखविण्यात आले. मालिका पाहण्यासाठी मंगळवार पेठेतील तालीम, संस्थेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व अबालवृध्दांनी मोठी गर्दी केली होती. मिरजकर तिकटी चौकात शिल्पकार शैलेश डोंगरसाने यांनी तयार केलेल्या 10 फुट उंचीचा अश्वारूढ पुतळय़ाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पुतळय़ाच्या पाठीमागे किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या किल्ल्याच्या प्रतिकृतीवर महाराणी ताराराणी व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा आहेत. आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण मिरजकर तिकटी परिसर उजळून निघाला आहे. 

यावेळी उत्सव समिती अध्यक्ष महेश जाधव, केशव चेंडके, प्रसाद खोराटे, प्रथमेश पाटील, अजिंक्य साळोखे, संतोष माळी, सुशांत चव्हाण, गणेश चिल, बाबुराव चव्हाण, बाबा पार्टे, माणिक मंडलिक, विजय देवणे, बाळासाहेब पाटील, अशोक पोवार, संभाजी जगदाळे आदींसह मंगळवार पेठेतील तालीम, संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक मोठय़ाप्रमाणात उपस्थित होते.