|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ग्रामीण भागातील रस्त्यांवर होतेय जीवघेणी कसरत

ग्रामीण भागातील रस्त्यांवर होतेय जीवघेणी कसरत 

वार्ताहर / पाचवड

वाई तालुक्यातील ग्रामीण भागात जोडणाऱया प्रमुख रस्त्यासह गावागावांना जोडणाऱया रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली असून खड्डे, चरी, खचलेल्या साईडपट्टय़ा तसेच अनेक ठिकाणच्या रस्त्यावर एकाच बाजूने तीव्र उतार असल्याने दुचाकी गाडय़ा घसरण्या बरोबर अवजड चार चाकी वाहने उलटण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाटचाल करताना जीवघेणी कसरत  करावी लागत आहे.

तालुक्यातील विकासासाठी शेकडो कोटी खर्च केल्याची वल्गना आज पर्यंत लोकप्रतिनिधिनी केली. परंतू ग्रामीण भागातील दळणवळणात महत्वाची भूमिका बजावणाऱया रस्त्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. केवळ राष्ट्रीय महामार्गच नव्हेतर तालुक्यातील शहराला जोडणारे प्रमुख रस्ते, गावागावांना जोडणारे रस्ते पूर्णपणे खचून गेले आहेत. रस्त्यावर चरी, साईडपट्टय़ांना बाजूस मूरमाची भर नसल्याने रस्ते खच खाऊ लागले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचल्याने रस्त्यावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूलाच तीव्र उतार असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून अवजड वाहनेही उलटत आहेत.

तसेच गेल्या काही महिन्यापासूनच ऊस गळीत हंगामाला प्रांरभ झाला आहे. त्यामुळे रस्त्याने आता उसाने भरलेले ट्रक्टर, वाळूची वाहतूक करणारे गाडय़ामुळे रस्त्यावरती वर्दळ वाढत आहे. त्यामुळे येथील महामार्गावर अपघात होण्याची शक्यता गडद बनली आहे.

खराब रस्त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असून गेल्या दोन वर्षात रस्त्यावर उभ्या असलेल्या ऊस ट्रॉलीला अंधारात वाहने धडक दिल्याने काहींणा यामध्ये जीव गमवावा लागला आहे. तरी संबधित अधिकाऱयांनी याप्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन यावरती उपाय योजना राबवाव्यात.

Related posts: