|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आदर्श संस्थेला जपानी शिष्टमंडळाची भेट

आदर्श संस्थेला जपानी शिष्टमंडळाची भेट 

प्रतिनिधी/ कुंकळ्ळी

बाळ्ळी येथील आदर्श कृषी सहकारी खरेदी विक्री प्रक्रिया संस्थेला जपान येथील गुरुवीनट्स कंपनीचे सीईओ ईचेरी सागवा आणि ब्लास्टॉन कॉर्पोरेशनचे सरव्यवस्थापक योपीयुबी कामियामा यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट दिली. त्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी पुष्पगुच्छ देऊन उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

यावेळी मेंगलुरू येथील आंचल इंडस्ट्रिसचे एम. एन. पै आणि आदर्श संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक राणू नाईक गावकर यांचीही उपस्थिती होती. वरील जपानी अधिकाऱयांनी संस्थेने शेतकऱयांसाठी हाती घेतलेल्या उपक्रमांची महिती करून घेतली. सेंद्रीय लागवडीसाठी करण्यात येत असलेल्या कार्याचीही त्यांना माहिती देण्यात आली. याशिवाय अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली.

शिष्टमंडळ प्रभावित

खड्डे, अडणे, बेंदुर्डे व इतर ग्रामीण भागांना जपानी अधिकाऱयांची भेट घडवून आणली गेली. सेंद्रीय लागवड करणाऱया शेतकऱयांची यावेळी त्यांना जवळून माहिती देण्यात आली. उभयतांनी आदर्श कृषी संस्थेच्या कार्याचे आणि अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप, व्यवस्थापकीय संचालक राणू नाईक गावकर तसेच एम. एन. पै घेत असलेल्या परिश्रमांचे कौतुक केले. संस्थेला सर्वतोपरी सहकार्य देण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

1500 टन काजुबियांची उलाढाल

दरम्यान, आदर्श संस्थेने चालू हंगामात अवघ्या 45 दिवसांत 1500 टन काजुबियांची उलाढाल साध्य केली असून 1070 टन खोबऱयाची विक्रीही करण्यात आली आहे. गतसाली संस्थेने 1390 टन भात, 1320 टन खोबरे, 145 क्विंटल वटंबसोले, 90 हजार नारळ, 2040 टन काजू विक्रीचा उच्चांक गाठला तसेच 67.74 कोटींची उलाढाल केली, अशी महिती यावेळी अधिकाऱयांकडून देण्यात आली.

संस्थेचे 1600 भागधारक असून सभासदसंख्या 27 हजार इतकी, तर सेंद्रीय लागवड करणाऱया शेतकऱयांची संख्या 2800 इतकी आहे. संस्थेच्या कार्यात 118 कर्मचारी कार्यरत आहेत. गोव्यातच नव्हे जगाच्या नकाशावर आदर्श संस्था पोहोचली असून शेतकऱयांच्या सहकार्याने हा उच्चांक गाठण्यात संस्थेला यश आले आहे, असे याप्रसंगी सांगण्यात आले.

Related posts: