|Thursday, September 19, 2019
You are here: Home » क्रिडा » फुटबॉलपटू अन्वर अलीला हृदयविकाराचा झटका

फुटबॉलपटू अन्वर अलीला हृदयविकाराचा झटका 

वृत्तसंस्था / कोलकाता

भारताचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू तसेच इस्ट बंगाल संघातील हुकमी स्ट्रायकर अन्वर अलीला मंगळवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सराव शिबिरानंतर घरी परत येताना अन्वर अलीला हृदयविकाराचा झटका आला. त्याच्यासमवेत असलेला सहकारी गुरूविंदर सिंगने लागलीच येथील खासगी रूग्णालयात त्याला दाखल केले. अन्वर अलीवर लवकरच बायपास शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.