|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अक्षयतृतीयेला कोटय़ावधींची उलाढाल

अक्षयतृतीयेला कोटय़ावधींची उलाढाल 

प्रतिनिधी /सातारा :

साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षयतृतीय. या मुहूर्तावर गुंजभर सोने घेण्याची संकल्पना आजही रुजलेली आहे. त्यामुळे साताऱयाच्या बाजारपेठेत सोने खरेदीसाठी सायंकाळी दुकानात गर्दी झाली होती. वाहक खरेदीमध्येही मोठय़ा प्रमाणावर उलाढाल झाली असून नवीन घर व जागा खरेदी करताही अनेक जण याचे बुकींग करताना दिसत होते. शुभमुहूर्तावर कोटय़ावधी रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यापाऱयांनी सांगितले. दरम्यान, अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा संदेशाची रेलचेलच सोशल मीडियावर सुरु होती.

हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीया या सणाला मोठे महत्व आहे. साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून ओळखला जातो. याबाबत श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले की, या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला. म्हणून त्याचा जन्मोत्सव करतात. तसेच या दिवसापासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला. परशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता. अक्षयतृतीयेचे वृत केले जाते. वस्तूंचे दान करतात. पितृश्राद्धही घालून ब्राम्हण भोजन घालावे. या तिथीस केलेले दान, हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय आहे, असे श्रीकृष्णांनी सांगितल्याचा उल्लेख मदनरत्न या ग्रंथात आहे.

शहरातील सोने, चांदीच्या बाजारपेठेत सकाळपासून गर्दी दिसत होती. दुपारी काही प्रमाणात गर्दी कमी झाली. परत सायंकाळी पुन्हा दुकाने गजबली. अक्षयतृतीया महिन्याच्या अखेरीला आल्याने नोकरदार वर्गाकडे पैसे आता नाहीत, त्यामुळे त्यांचा प्रतिसाद नाही, असे घोडके सराफचे कुणाल घोडके यांनी सांगितले. तसेच शहरात गुढी पाडव्यानंतर केंद्र शासनाने बीएसआय 3 च्या गाडय़ा बंदीचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे या मुहूर्तावर गाडय़ा खरेदी करणाऱयांचा परिणाम जाणवत होता. म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने हेम एजन्सीच्या विक्रेत्यांनी सांगितले. तर जागा खरेदी व प्लॅटसमध्ये विक्रीमध्ये तुरळक प्रतिसाद मिळत असल्याने यावर्षी म्हणावी अशी उलाढाल झाली नाही, असे बिल्डर असोसिएशनचे टक्कर यांनी सांगितले.

Related posts: