|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Top News » महिलांच्या नावे जमीन खरेदी निःशुल्क ; झारखंड सरकारचा निर्णय

महिलांच्या नावे जमीन खरेदी निःशुल्क ; झारखंड सरकारचा निर्णय 

ऑनलाईन टीम / रांची :

महिलांच्या नावे जमीन खरेदी केल्यास रजिस्ट्रीवर स्टॅम्प डय़ुटीसाठी अवघा एक रुपया आकारण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय झारखंड सरकारने घेतला आहे. याबाबतची घोषणा झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी केली.

जमीन सुधार विभागाच्या समीक्षा बैठकीदरम्यान मुख्यमंत्री दास यांनी ही घोषणा केली. सरकारच्या या निर्णयामुळे फक्त महिलांच्या नावे जमीनीची खरेदी केल्यास निःशुल्क करण्यात होणार आहे. यापूर्वी राज्यात स्टॅम्प आणि रजिस्ट्रेशनसाठी महिलांसाठी दहा टक्क्यांची सवलत देण्यात येत होती. सरकारच्या या निर्णयामुळे आता महिलांना अवघ्या एका रुपयात स्टॅम्प डय़ुटी आकारण्यात येणार आहे.