|Thursday, September 19, 2019
You are here: Home » विविधा » शरीरात तब्बल 200हून अधिक टाचण्या !

शरीरात तब्बल 200हून अधिक टाचण्या ! 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतल्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका रूग्णाच्या शरीरात 200 हून अधिक टाचण्या असल्याचे दिसून आले आहे. हे पाहून डॉक्टर देखील थक्क झाले आहेत. या व्यक्तीच्या शरीरात टाचण्यांचा साठा आढला आहे.

मणसाचा एक्स रे काढला आसता या टाचण्या आढळून आल्या आहेत. मुंबईतल्या जगजीवन राम रूग्णालयात आलेल्या या रूग्णावर उपचार करणे मुंबईतल्या डॉक्टरांपुढे एक मोठे आव्हान ठरले आहे. कारण शेकडो पिना त्याच्या शरीरात घर करून बसल्या आहेत. या व्यक्तीच्या शरीरात टाचण्या गेल्याच कशा, असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या टाचण्या आल्या कशा हे रूग्णाच्या कुटुंबीयांनाही ठाऊक नाही. एका मंत्रिकासोबत या रूग्णाचा संपर्क झाला होता, त्याच मंत्रिकाने एखाद्या खाद्यपदार्थात घालून या टाचण्या त्याच्या शरीरात घातल्याचा दावा केला जात आहे.