|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » रिलायन्स सॅपच्या मदतीने आणणार ‘सरल जीएसटी’

रिलायन्स सॅपच्या मदतीने आणणार ‘सरल जीएसटी’ 

मुंबई :

 करदात्यांना वस्तू आणि सेवाकर संदर्भात सुविधा पुरविण्याकरीता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील रिलायन्स कार्पोरेट आईटी पार्क (आरसीआईटीपीएल) आणि व्यावसायिक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर निर्माता दिग्गज जर्मन कंपनी सॅप दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला आहे. बुधवारी कंपनीकडून याविषयीची माहिती देण्यात आली.

नव्या वस्तू व सेवाकर पद्धतीची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार असल्याचे सरकारकडून याआधीच जाहीर करण्यात आले आहे. या अनुषंगाने करदात्यांना जीएसटी अनुरूप सक्षम बनवण्याकरिता आपले नवे उत्पादन साहाय्यक ठरणार असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी आरसीआईटीपीएलकडून सांगण्यात आले आहे. ‘सरल जीएसटी’ नावाच्या या उत्पादनामुळे जीएसटी कार्यपद्धती समजून घेत त्याचा सहजपणे वापर करणे शक्य होणार आहे. वस्तू व सेवाकर विषयक सेवा प्रदाती कंपनी म्हणून ‘आरसीआईटीपीएल’ची, तर ऍप्लिकेशन सेवा प्रदाता कंपनी  ‘एसएपीकडून’ सॅप सॉफ्टवेअर संबंधी विशेषत्व, अनुभव, आणि मागदर्शनाचा ‘सरल जीएसटी’ च्या वापरकर्त्यांना लाभ मिळणार आहे. 

महत्त्वाकांक्षी डिजिटल इंडिया मोहिमेला अधिक गती देण्याच्या दृष्टीने जीएसटीकडे एक संधी म्हणून आपण पाहत आहोत. ‘सरल जीएसटी’ म्हणजे गत दोन दशकांपासून सुरू असलेल्या जर्मन दिग्गज एसएपी आणि रिलायन्समधील भागीदारीचा विस्तार आहे. जे करदात्यांना सुरक्षित डिजिटल व्यवसायात बदलण्यास एंड -टू-एंड साहय्य पुरविणार असल्याचे रिलायन्स जीएसटीचे प्रमुख राजकुमार एन पुगालिया यांनी यावेळी बोलताना सांगितले.