|Monday, February 24, 2020
You are here: Home » क्रिडा » ज्युवेन्ट्सची अंतिम फेरीत धडक

ज्युवेन्ट्सची अंतिम फेरीत धडक 

वृत्तसंस्था/ टय़ूरिन-इटली

डॅनी ऍल्वेसच्या धमाकेदार गोलमुळे ज्युवेन्ट्सने चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या स्पर्धेत मागील 3 वर्षांच्या कालावधीत अंतिम फेरीत पोहोचण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे. मंगळवारी उशिरा रंगलेल्या परतीच्या उपांत्य फेरीत 2-1 असा विजय संपादन केल्यानंतर त्यांनी मोनॅकोचे आव्हान 4-1 असे संपुष्टात आणले. या स्पर्धेच्या इतिहासात त्यांनी एकूण नवव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.

मोनॅको संघाचा नबिल दिरार सराव सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे येथे खेळू शकला नाही व त्याच्या गैरहजेरीत प्रशिक्षक लिओनार्डो जार्डिमने 3-5-2 अशा रचनेवर भर दिला. ज्युवेन्ट्सतर्फे मॅरिओने 33 व्या मिनिटाला 6 यार्डांच्या बॉक्समध्ये डाव्या बाजूने गोलजाळय़ाचा यशस्वी वेध घेतला तर डॅनी ऍल्वेसने 44 व्या मिनिटाला संघाचा दुसरा गोल नोंदवला. मोनॅकोतर्फे किलियनने 69 व्या मिनिटाला एकमेव गोल केला. मात्र, तोवर ज्युवेन्टसच्या एकतर्फी विजयावर जवळपास शिक्कामोर्तब झाले होते.

Related posts: