|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ल्हासुर्णे येथील महिलेच्या बलात्कारप्रकरणी तिघांना अटक

ल्हासुर्णे येथील महिलेच्या बलात्कारप्रकरणी तिघांना अटक 

वार्ताहर / एकंबे

ल्हासुर्णे येथील ओळखीच्या महिलेला पळवून नेऊन कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत पुणे, सोलापूर व पेनूर येथे सातत्याने बलात्कार केल्याप्रकरणी सोलापूर जिह्यातील तिघांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर तातडीने हालचाल करत पोलिसांनी तिघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना रितसर अटक करण्यात आली आहे. 

याबाबत पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, ल्हासुर्णे येथील 30 वर्षीय महिला सोमवारी आठवडा बाजारासाठी कोरेगावात आली होती. बाजारात खरेदी केल्यानंतर ती घरी जाण्यासाठी निघाली होती, त्याचदरम्यान तिची ओळखीच्या धनाजी भोसले याच्याबरोबर गाठ पडली. त्याने घरी सोडण्याचे नाटक करुन तिला गाडीत बसविले. त्यानंतर शहरातून वाठारकडे जाणाऱया रस्त्यावर गाडी नेली. या रस्त्याला गाडी का नेता, अशी विचारणा या महिलेने केल्यानंतर धनाजी याने तु शांत बस, माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे, असे बजावले. महिलेने त्याला नकार दिल्यानंतर तुझ्या नवऱयाला आणि मुलांना जीवंत सोडणार नाही, अशी धमकी धनाजी याने दिली. 

धनाजी याच्यासह मित्र महेश व समाधान महानवर यांनी महिलेला सोलापूर व पुणे जिह्यात विविध ठिकाणी डांबले. धनाजी याने पुणे, सोलापूर व पेनूर या ठिकाणी वारंवार बलात्कार केला, अशी तक्रार या महिलेने मंगळवारी रात्री कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन तातडीने हालचाल करत सोलापूर जिह्यात जाऊन तिघांना अटक केली.  धनाजी विलास भोसले, महेश (पूर्ण नाव माहीत नाही) व समाधान ज्ञानदेव महानवर, रा. बिटरगाव, ता. पंढरपूर अशी तिघांची नावे आहेत. उपनिरीक्षक बळीराम सांगळे अधिक तपास करत आहेत.

Related posts: