|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मडगावातील मलनिस्सारण योजनेचे काम 31 मे पर्यंत पूर्ण करावे

मडगावातील मलनिस्सारण योजनेचे काम 31 मे पर्यंत पूर्ण करावे 

प्रतिनिधी/ मडगाव

मडगावातील मलनिस्सारण योजनेचे काम 31 मे पर्यंत पूर्ण करण्यास आपण संबंधित खात्याला मुदत देत आहे. त्यानंतर आपण कोणत्याही परिस्थिती हे काम करण्यास मान्यता देणार नाही अशी माहिती मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पावसाळय़ात हे काम चालू ठेवल्यास प्रचंड गैरसोय होणार असल्याचे श्री. कामत म्हणाले.

दरम्यान, मलनिस्सारण योजनेचे काम 25 मे पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर काम हाती घेतले जाणार नसल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले आहे. सद्या मडगाव शहरातील काही भागात मलनिस्सारण योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे बऱयाच ठिकाणी खोदकाम हाती घेण्यात आले आहे. हे काम 31 मे पर्यंत पूर्ण करावे असे निर्देश श्री. कामत यांनी संबंधितांना दिले आहे. पावसाळय़ापूर्वी खोदकाम करण्यात आलेल्या सर्व रस्त्याची डागडूजी देखील करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

दरम्यान, मडगाव मतदारसंघातील पेडा, खारेबांद, चिंचाळ, कालकोंडा, सारवोडे आणि शिरवडे परिसरातील पाणीपुरवठा अखेर सुरळीत झाल्याची माहिती आमदार दिगंबर कामत यांनी दिली. आपण, या भागातील पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केले होते. नव्या जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव तयार करून संबंधित खात्याला सादर केला होता व त्यानंतर पाठपुरावा देखील केला होता असे श्री. कामत म्हणाले.

या पाणी पुरवठय़ा संदर्भात नगरसेवक केतन कुडतरकर यांनी ही आपण पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतल्याचा दावा केला होता. आमदार व नगरसेवक यांच्या दावा-प्रतिदाव्यामुळे पाण्याचा विषय सद्या चर्चेचा विषय बनला आहे.

Related posts: