|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गृहनिर्माण व मच्छिमारी पतसंस्था प्रकोष्ठ पदाधिकाऱयांच्या मडगावात बैठका

गृहनिर्माण व मच्छिमारी पतसंस्था प्रकोष्ठ पदाधिकाऱयांच्या मडगावात बैठका 

 

प्रतिनिधी/ मडगाव

‘सहकार भारती’ गोवा तर्फे रविवार दि. 14 मे रोजी गृहनिर्माण पतसंस्था प्रकोष्ठ पदाधिकाऱयांची अखिल भारतीय बैठक आयोजित केली आहे. तर सोमवार दि. 15 रोजी गोव्यात पहिल्यांदाच मच्छिमारी पतसंस्थांचे प्रकोष्ठ पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली आहे. या दोन्ही बैठका मडगावच्या मोती डोंगरावरील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या गेस्ट हाऊसमध्ये होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली

सहकार भारती गोवाचे अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, सहकार भारती ही शिखर संस्था अखिल भारतीय स्तरावर सहकारी पतसंस्थाचे प्रतिनिधीत्व करते, 22 राज्यांतील गृहनिर्माण, मच्छिमारी, ग्राहक संस्था, विविध कार्यकारी संस्था, नागरी व ग्रामीण कर्ज पुरवठा करणाऱया पतसंस्था व बँका, कामगार पत संस्थांचे सदस्य व वैयक्तिक सदस्यांचे संघटन व समस्या उकल करण्याचे कार्य 1995 पासून गोव्यात व इतरत्र सुरू आहे.

मडगावात होणाऱया दोन्ही बैठकांना ऍड. जयंत कुलकर्णी (गृहनिर्माण प्रकोष्ठ प्रमुख), पांडुरंग नाईक (मच्छिमारी पत संस्था प्रकोष्ठ प्रमुख) आणि सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री विजय देवांगण बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. पहिल्या बैठकीच्या उद्घाटनाला कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे तर दुसऱया बैठकीच्या उद्घाटनाला वीजमंत्री पांडुरंग मडकईकर उपस्थित राहणार आहेत. शिवाय या बैठकांना गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई व मार्केटींग फेडरेशनचे अध्यक्ष उल्हास अस्नोडकर यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. दोन्ही उद्घाटन सोहळे सकाळी 9.30 वाजता होणार आहेत.

नव्याने समंत झालेला ‘रेरा’ (स्थावर मालमत्ता नियमन कायदा), ‘मच्छक्रांती’ योजना व इतर समस्या व पतसंस्थाच्या मागण्याबरोबरच सहकार क्षेत्राच्या केंद्र सरकारकडून अपेक्षा व मागण्या या बाबत दोन दिवस महत्वाचे निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या पत्रकार परिषदेला सहकार भारती गोवाचे सरचिटणीस सतीष भट व सतीष वेळीप उपस्थित होते.

Related posts: