|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फेब कलर फेमिना मिस इंडिया

फेब कलर फेमिना मिस इंडिया 

प्रतिनिधी/ पर्वरी

फेब कलर फेमिना मिस इंडिया 2017 या स्पर्धेची पश्चिम विभाग करीता प्राथमिक निवड फेरी येथील ‘मॉल दी गोवा’ मध्ये मोठय़ा दिमाखात पार पडली. यावेळी पश्चिम विभागातून ओड्रेय डिसिल्वा (गोवा), अनुष्का लोबो (गोवा), केझाया काल्डेरा (गोवा) या तीन सौदयांवतीना निवडण्यात आले. त्यांना सुवर्ण तिकीट देण्यात आले. त्यांची पुढील निवड फेरी पुणे येथील हयात रेजन्सीत दि. 23 मे रोजी होणार आहे.

या स्पर्धेत गोव्यातील वेगवेगळा भागातून शंभराहून अधिक सौंदर्यावतीनी भाग घेतला होता. युवतीच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी दर वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेचे परीक्षण भारतीय सौंदर्यावती आणि बिग बॉसची पहिली स्पर्धक कॅरोल ग्रासियस आणि मेल्विन नरोना यांनी केले.

‘मिस इंडिया’चे यंदाचे हे 54वे वर्ष असून त्यात अनेक बदल केले आहेत. भारतातील सर्व राज्यातून सौंदर्यावतींची निवड करुन अंतिम फेरीसाठी मिस इंडिया राजस्थान, मिस इंडिया गुजरात, मिस इंडिया गोवा आणि मिस इंडिया महाराष्ट्र या चार राज्यातील सौंदर्यावतीची मुंबई येथे जून महिन्यात अंतिम फेरी होऊन मिस इंडिया हा किताब बहाल केला जाणार आहे.

Related posts: