|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » ‘त्या’ वक्तव्यावरुन दानवेंची दिलगिरी

‘त्या’ वक्तव्यावरुन दानवेंची दिलगिरी 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

मी शेतकऱयांना उद्देशून कोणतेही वक्तव्य केले नाही, अपशब्द वापरले नाहीत, मी स्वतः शेतकऱयांच्या पोटी जन्म घेतला आहे, त्यामुळे शेतकऱयांचे दुःख मी जाणतो, शेतकऱयांची मने दुखावली असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी दिलगिरी व्यक्त केली.

शेतकरी नेहमी दर नाही, दर नाही म्हणून रडगाणी गात असतात. आता हे बास करा, असे वादग्रस्त विधान दानवे यांनी केले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर अखेर आज त्यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली.

Related posts: