|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » माकडतापाचा अकरावा बळी

माकडतापाचा अकरावा बळी 

बांदा : बांदा -सटमटवाडी येथील विजय शांताराम कुडव (67) यांचा गुरुवारी दुपारी गोवा बांबोळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेले काही दिवस ते माकडतापाने आजारी होते. त्यांच्या निधनाने माकडताप बळींची संख्या 11 वर गेली आहे. कुडव यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आहे.

 विजय कुडव बांदेश्वर मंदिराजवळ पायलट व्यवसाय करत होते. ते काही दिवस तापाने आजारी असल्याने 4 मे रोजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले होते. त्यांचा रक्तनमुना केएफडी पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना 6 मे रोजी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतांनाच गुरुवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.

 बांदा भागात गेले काही महिने माकडतापाने थैमान घातले आहे. आतापर्यंत या आजाराने दहाजणांचा बळी घेतला. 29 एप्रिलला पडवे-माजगाव येथील रेश्मा रमेश राऊत यांचा बळी गेला होता. आतापर्यंत या भागातील 288 जणांचे रक्तनमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 106 जणांना केएफडीची लागण झाल्याचे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. प्रणाली कासार यांनी सांगितले.

 गेले काही दिवस माकडताप जोखीमग्रस्त भागात वीज नसल्याने या भागातील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून मात्र दखल न घेता खिल्ली उडविली जात आहे.

Related posts: