|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कंटेनर-कार धडकेनंतर उडाला भडका

कंटेनर-कार धडकेनंतर उडाला भडका 

 नागठाणे :

ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर भरतगाववाडी (ता.सातारा) गावच्या हद्दीत दुचाकी घेऊन निघालेल्या कंटेनरला भरधाव वेगाने आलेल्या फोर्ड आयकॉन कारने पाठीमागून धडक दिल्यानंतर कंटेनरखाली अडकलेल्या कारने पेट घेतल्याने महामार्गावर एकच थरार निर्माण झाला. भरतगाववाडीच्या युवकाच्या प्रसंगावधानामुळे पेटत्या कारमध्ये अडकलेला पेटता कंटेनर बाजूला काढला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार, कंटेनर व त्यामधील 25-30 दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. गुरुवारी पहाटे 6 च्या सुमारास हा बर्निंग थरार झाला. यामुळे महामार्गावरील कराड बाजूकडील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. अपघातात कारमधील तिघे जखमी झाले असल्याचे समजते.

  याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून रात्री निघालेली फोर्ड आयकॉन (एम.एच.02-ए.जी.9598) कोल्हापूरकडे निघाली होती. मिळालेल्या माहितीनुसार कारमध्ये चालकासह एक दांपत्य व एक लहान मुलगा असल्याचे समजते. गुरुवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास ही भरधाव वेगात असणारी कार महामार्गावरील भरतगाववाडी येथे आली असता ती पुढे चाललेल्या कंटेनरच्या मागच्या बाजूला जोरात जाऊन धडकली व कंटेनरमध्येच तशीच अडकली. याच स्थितील ही दोन्ही वाहने सुमारे 300-400 फूट तशीच पुढे हेरंब मंगल कार्यालयासमोर जाऊन थांबली. अपघातानंतर कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले तर इतर ग्रामस्थांनी कारमधील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पुढे पाठविले.

Related posts: