|Friday, November 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » हिमाचलच्या भाजप नेत्याचा कांग्रेसमध्ये प्रवेश

हिमाचलच्या भाजप नेत्याचा कांग्रेसमध्ये प्रवेश 

हमीरपूर :

 हिमाचल प्रदेशच्या हमीरपुरातील भारतीय जनता पक्षाच्या एका दिग्गज नेत्यांने पक्षत्याग करत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री विरभद्रसिंह यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सार्वजनिक बैठकित विनोद ठाकुर यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी विनोद ठाकूर यांनी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमाळ यांच्यावर निशाणा साधला. प्रामाणिक पक्षकार्यकर्त्याना दुर्लक्षीत करत धुमाळ आपल्या संतान आणि नातेवाईकांचा उद्धार करण्यात व्यस्त आहेत. त्यांच्या कार्यकाळात भाजपाला वैयक्तिक कंपनीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आगामी निवडणुकीत धुमाळ यांच्या नेत्तृवाखालील भाजपचा पराभव निश्चित असून काँग्रेसला पुन्हा एकदा सत्ता स्थापण्याची संधी असल्याचा दावा ही ठाकूर यांनी यावेळी केला. ठाकुर यांचे पक्षात स्वागत करतांना ते काँग्रेससाठी बहुमूल्य ठरणार असल्याचे विरभदसिंह यांनी सांगितले.

Related posts: