|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दोडामार्गला 85 टक्के मतदान

दोडामार्गला 85 टक्के मतदान 

दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगर पंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी शांततेत 85 टक्के मतदान झाले. 180 पैकी 153 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी शुक्रवारी होणार आहे.

प्रभाग क्र. सातच्या पोटनिवडणुकीसाठी हे मतदान झाले. यापूर्वी या प्रभागातून शिवसेनेच्या सौ. संध्या राजेश प्रसादी या नगरसेवक म्हणून विजयी झाल्या होत्या. नगराध्यक्ष निवडीवेळी सौ. प्रसादी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष नानचे यांना मतदान केले होते. त्यावेळी शिवसेनेचे गटप्रमुख संतोष म्हावळकर यांनी युतीचे उमेदवार सुधीर पनवेलकर यांना मतदान करण्याचा व्हीप बजावला होता. मात्र, व्हीप डावलून सौ. प्रसादी यांनी काँग्रेसचे नानचे यांना मतदान केल्याने पक्षांतर्गत बंदी कायद्यांतर्गत सौ. प्रसादी यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱयांकडे अपिल करण्यात आले होते. त्यानुसार झालेल्या सुनावणीत सौ. प्रसादी यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आल्याने प्रभाग सातसाठी पुन्हा निवडणूक घेण्यात आली.

प्रभाग क्र. सातमधून शिवसेनेच्या सौ. फुलराणी ज्ञानेश्वर गावकर व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सौ. अदिती अजय मणेरीकर यांच्यात लढत झाली. बुधवारी सकाळी मतदानास सुरुवात झाली. शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादीचे बुथ लागले होते. अगदी सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केली होती. दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 70 टक्केवर पोहोचली होती. शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, संतोष म्हावळकर, दिवाकर गवस, चेतन चव्हाण यांच्यासह अन्य कार्यकर्ते प्रभागात ठाण मांडून होते. नगराध्यक्ष संतोष नानचे, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश गवस आदींनीही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बूथवर हजेरी लावली होती.

Related posts: