|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » सोनिया गांधींनी केजरीवालांना वगळले,सर्व विरोधकांना भोजनाचे निमंत्रण

सोनिया गांधींनी केजरीवालांना वगळले,सर्व विरोधकांना भोजनाचे निमंत्रण 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अनैपचालिक भेटीसाठी निमंत्रित केले आहे. मात्र यावेळी सोनिया यांनी आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निमंत्रण करणे टाळले आहे.

सोनिया गांधी यांनी शुक्रवारी विरोधी पक्षांसाठी भोजन समारंभाचे आयोजन केले आहे. याचदरम्यान विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी चर्चा होणार आहे. “लंच पे चर्चा’निमित्ताने, नरेंद्र मोदी सरकार तीन वर्ष पूर्ण करत असतानाच सरकारला विरोधकांची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

Related posts: