|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘शिरोळ दत्त’चे साखर वाहतूक करणारे ट्रक स्वाभिमानीने फोडले

‘शिरोळ दत्त’चे साखर वाहतूक करणारे ट्रक स्वाभिमानीने फोडले 

प्रतिनिधी/ शिरोळ

sयेथील स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यामधील साखर भरूण जाणारे तीन ट्रक फोडले. गुरूवार 25 रोजी दुपारी चार वाजता शिरोळ-जयसिंगपूर रोडवरील जिरगे पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. यामध्ये ट्रकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना व युवा स्वाभिमानी संघटनेने ऊसाचा दुसरा हप्ता पाचशे रुपये 22 मे अखेर न दिल्यास साखर बाहेर सोडली जाणार नसल्याचे जाहीर केले होते. बुधवार 24 रोजी सायंकाळी गुरूदत्त साखर कारखान्यामधील साखर भरूण जाणारे दोन ट्रक कुरूंदवाडमध्ये फोडले होते. पुन्हा गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास 25 ते 30 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यातून राजस्थान मधील आलेले ट्रक नं. आर.जे. 19 जी.ई. 8517, आर.जे. 19 जी.ई. 6807, आर.जे. 19 जी.ई. 8357 या मधून साखरेची पोती घेऊन जात होते. शिरोळ-जयसिंगपूर रोडवरील जिरगे पेट्रोल पंपाजवळ या गाडय़ावर दगड मारून काचा फोडल्या व टायरीमधील व्हॉल तोडले. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला आहे. शिरोळ पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सदर प्रकरणी शिरोळ पोलिसांनी रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

sयेथील स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यामधील साखर भरूण जाणारे तीन ट्रक फोडण्यात आले. गुरूवार 25 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांनी शिरोळ-जयसिंगपूर रोडवरील जिरगे पेट्रोल पंपाजवळ साखर भरूण जाणाऱया ट्रक फोडण्यात आले. यामध्ये ट्रकांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना व युवा स्वाभिमानी संघटनेने ऊसाचा दुसरा हप्ता पाचशे रूपये 22 मे अखेर न दिल्यास साखर बाहेर सोडली जाणार नसल्याचे जाहीर केले होते. बुधवार 24 रोजी सायंकाळी गुरूदत्त साखर कारखान्यामधील साखर भरूण जाणारे दोन ट्रक कुरूंदवाडमध्ये फोडले होते. पुन्हा गुरूवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास 25 ते 30 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यातून राजस्थान मधील आलेले ट्रक नं. आर.जे. 19 जी.ई. 8517, आर.जे. 19 जी.ई. 6807, आर.जे. 19 जी.ई. 8357 या मधून साखरेची पोती घेवून जात होते. शिरोळ-जयसिंगपूर रोडवरील जिरगे पेट्रोल पंपाजवळ या गाडय़ावर दगड मारून काचा फोडल्या व टायरीमधील व्हॉल तोडले. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला आहे.

शिरोळ पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सदर प्रकरणी शिरोळ पोलिसांनी रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.