|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मुख्यमंत्र्यांना भेटायचे असेल तर नीटनेटके होऊन या !

मुख्यमंत्र्यांना भेटायचे असेल तर नीटनेटके होऊन या ! 

कुशीनगर :

 उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 25 मे रोजी कुशीनगर जिह्यातील मुसहर वस्तीच्या दौऱयावर गेले होते. योगी तेथे पोहोचण्यापूर्वी तेथील लोकांना साबण, शाम्पू आणि अत्तर वाटण्यात आले. मुख्यमंत्र्यांनजीक जायचे असल्यास आंघोळ करून आणि पावडर लावून जा असे अधिकाऱयांनी लोकांना सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱयापूर्वी तेथील लोकांना नीटनेटके राहण्याची सक्त ताकीद देण्यात आली होती. योगींनी 25 मे रोजी कुशीनगरमध्ये जपानी इंसफेलायटिस विषयक लसीकरण मोहीम सुरू केली होती. यादरम्यान ते मुसहर येथे जाणार होते, परंतु त्यांना काही कारणास्तव तेथे जाता आले नाही, मुसहरचे रहिवासी गवताने उभारलेल्या झोपडीत राहत असून तेथे गरीबीचे प्रमाण अधिक आहे. जपानी इंसेफेलायटिस पूर्वांचलच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा असून लसीकरणामुळे या रोगाचे समूळ उच्चाटन होईल असा दावा योगींनी केला होता.