|Thursday, November 14, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » अफगाणिस्तानात झालेल्या बॉम्बस्फोटात 18 जण ठार

अफगाणिस्तानात झालेल्या बॉम्बस्फोटात 18 जण ठार 

काबुल

: रमजानचा पवित्र महिना सुरू होताच शनिवारी अफगाणिस्तानच्या खोस्त भागात आत्मघाती हल्लेखोरांनी कारबॉम्बचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. तर अफगाणिस्तानच्या दुसऱया भागांमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांदरम्यान सुरू असलेल्या संघर्षात 36 जण मारले गेले आहेत.  खोस्त प्रांताच्या पूर्व क्षेत्रात लष्करी तळाला लागून असलेल्या फुटबॉल मैदानात हल्लेखोराने कारबॉम्ब स्फोट घडवून आणला. स्फोटातील मृतांमध्ये सामान्य नागरिकांसमवेत खोस्त प्रादेशिक सेनेचे जवान सामील आहेत. शुक्रवारी तालिबानच्या दहशतवाद्यांनी कंदहारच्या एका लष्करी तळावर हल्ला करून 15 सैनिकांना ठार केले होते. तर हेरात प्रांतामध्ये एक बस स्फोट घडवून आणत उडविण्यात आली. या स्फोटात बसमधील 10 प्रवाशांचा मृत्यू झाला.

 

Related posts: