|Sunday, March 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » मैत्रीची युथफुल कथा एफयु

मैत्रीची युथफुल कथा एफयु 

फ्रेश लुक, न संपणारी एनर्जी, रोमान्स, तरुणाई ऍटिटय़ूड आणि फुल ऑफ लाईफने भरलेल्या या वर्षातील सर्वात धमाकेदार असा एफयु अर्थात फ्रेण्डशिप अनलिमिटेड हा सिनेमा येत्या 2 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सैराटच्या भव्य यशानंतर करोडो लोकांच्या आणि विशेषत: तरुणींच्या मनात घर केलेल्या आकाश ठोसर एफयु या चित्रपटातून एका ट्रेंडी लुक मध्ये आपल्या समोर येत आहे. आकाश बरोबरच सत्या मांजरेकर, मयूरेश पेम, शुभम किरोडीयन, माधव देवचक्के, पवनदीप, वैदेही परशुरामी, संस्कृती बालगुडे, स्वामिनी वाडकर, रिया बर्मन, राधा सागर, मधुरा देशपांडे, स्वरदा ठिगळे या तरुण कलाकारांबरोबरच सचिन खेडेकर, मेधा मांजरेकर, शरद पोंक्षे, दिवंगत अश्विनी एकबोटे, भारती आचरेकर आणि महेश मांजरेकर या अनुभवी कलाकारांची फौज दिसते त्याचबरोबर बोमन इराणी आणि ईशा कोप्पीकर हे बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध कलाकार सुद्धा या चित्रपटात आहेत. नटसम्राट, ध्यानीमनी या आशयघन चित्रपटानंतर महेश मांजरेकर तमाम तरुणाईचे प्रतिनिधित्व करणाऱया पात्रांचा आणि आजच्या तरुणाईची भाषा बोलणारा एफयु हा चित्रपट घेऊन येत आहेत.

बॉलीवूडमधील कलाकारांबरोबरच फिल्म इंडस्ट्रीतील तगडे व्यावसायिक या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी एकत्र आले आहेत. टी सिरिजचे भूषण कुमार आणि किशन कुमार हा चित्रपट प्रस्तुत करत आहेत. त्यांची ही प्रसिद्ध संस्था या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसफष्टीत पदार्पण करीत आहे, त्याचबरोबर बॉलीवूडमधील अनेक भव्य आणि मोठय़ा बॅनरचे चित्रपट आणि बाहुबली या चित्रपटाचे वितरक अनिल थडानी एफयुचे वितरण करीत आहेत.

विशाल मिश्रा आणि समीर साप्तीस्कर यांनी अतिशय युथफूल आणि ठेका धरायला लावणारे संगीत दिले आहे. महेश मांजरेकरांनी दिग्दर्शनाबरोबरच अभिजित देशपांडे यांच्या साथीने या चित्रपटाचे लेखनसुद्धा केले आहे. एफयुची निर्मिती अभय गाडगीळ, महेश पटेल, दिनेश किरोडीयन आणि महेश मांजरेकर यांनी केली आहे.

Related posts: