|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » leadingnews » नक्षलावाद्यांकडून अक्षय कुमार आणि सायना नेहवालचा निषेध

नक्षलावाद्यांकडून अक्षय कुमार आणि सायना नेहवालचा निषेध 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना अर्थिक

मदत देणाऱया बॉलिवूड अभिनेतग अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्याविषयी नक्षलवाद्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नक्षलवाद्यांनी त्यांच्या या कृतीचा निषेध व्यक्त करणारी पत्रके वाटली आहेत. या पत्रकांमध्ये आम्ही नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱया अर्थिक मदतीचा निषेध करत असल्यचे म्हटले आहे.

देशातील प्रसिद्ध व्यक्ती, कलाकार,खेळाडू आणि सेलिब्रिटींनी क्रांती आणि गरिबांच्या बाजून उभे रहावे, असे आवाहन आम्ही करतो. तसेच त्यांनी पोलिसांच्या आत्याचाराचा आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात अवाज उठवावा,असे नक्षलवाद्यांनी वाटलेल्या पत्रकांत म्हटले आहे. मार्च महिन्यात सुकमा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले होते. गेल्या काही वर्षांमध्ये सुरक्षा दलांवर झालेल्या मोठय़ा हल्ल्यांपैकी एक म्हणून या हल्ल्याची गणना झाली होती. या हल्ल्यानंतर अक्षय कुमार याने शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 9 लाख रूपये तर सायना नेहवाल हिने प्रत्येक कुटुंबाला 50 हजार याप्रमाणे सहा लाख रूपयांची अर्थिक मदत देऊन केली होती.