|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जुनेबेळगाव येथे घर कोसळले

जुनेबेळगाव येथे घर कोसळले 

प्रतिनिधी  / बेळगाव

शहरात पावसाचे आगमन झाले असून मान्सुनपुर्व पावसाने बुधवारी सकाळी जोरदार सलामी दिली. यामुळे काही नागरिकांच्या घरांना याचा फटका बसला आहे. झालेल्या पावसामुळे जुने बेळगाव येथील घराची भिंत कोसळून छताचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील सदस्य बाजूच्या खोलीत असल्याने कोणता अनर्थ घडला नाही.

 लक्ष्मी गल्ली जुनेबेळगाव येथील रहिवासी शोभा कल्लाप्पा होसमनी यांच्या घराचे नुकसान झाले आहे. कौलारू व पत्र्याच्या घरातील भिंती पडून छत कोसळले. यामुळे घराचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले आहे. होसमनी यांची परिस्थिती हलाखीची असल्याने रोजदांरीवर काम करून उदरनिर्वाह चालवितात. यामुळे महापालिकेने याची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. 

Related posts: