|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » इतर राज्यांमध्ये देखील होतात ‘टॉपर’ घोटाळे : नितीश कुमार

इतर राज्यांमध्ये देखील होतात ‘टॉपर’ घोटाळे : नितीश कुमार 

पाटणा :

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी टॉपर घोटाळ्यावर बोलताना राज्यातील काही व्यक्ती राज्याची प्रतिमा बिघडवित असल्याचे म्हटले. बिहारच्या सरकारी शाळांच्या खराब कामगिरीप्रकरणी त्यांनी कॉपीचे प्रकार रोखल्याने असे घडल्याचा दावा केला. तामिळनाडूत एका भरती परिक्षेत हरियाणाचा मुलगा पहिला आला होता. सीबीआय त्या प्रकरणाची चौकशी करत असून त्या प्रकरणाला चर्चेचा विषय करण्यात आला नाही असा आरोपही त्यांनी केला. टॉपर घोटाळे घडवून आणणारे अनेक प्रकारचे लोक समाजात आहेत. यंत्रणेत कोणी फेरफार करू शकत नाही असा दावा कोणालाच करता येणार नाही. टॉपर घोटाळ्याची चौकशी सुरू असून दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल असे नितीश यांनी सांगितले. मागील वर्षाप्रमाणेच यावर्षी देखील टॉपर घोटाळा उघडकीस आला आहे. 12 वीच्या कला शाखेतून पहिला आलेल्या विद्यार्थ्याने बनावटगिरी केल्याचे समोर आले होते.

Related posts: