|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » सृष्टीच्या वाढदिवसातून नवी दृष्टी

सृष्टीच्या वाढदिवसातून नवी दृष्टी 

ऑनलाईन टीम / पुणे  :
मूळच्या कोकणातील व पुण्यात स्थायिक असलेल्याा राहुल आणि स्नेहल कदम या  दांपत्याने आपली कन्या सृष्टी हिचा वाढदिवस अनावश्यक खर्चाला फाटा देत येथील अनाथ हिंदू महिलाश्रमातील मुलींसोबत उत्साहात साजरा केला. संस्थेला आपल्या कार्यासाठी १० हजार रुपयांची देणगी देतानाच सामाजिक बांधिलकीचेही दर्शन त्यांनी घडवले आहे.
 कदम कुटुंबीय हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील रामपूर गावचे. राहुल हे पुण्यातील एका आयटी कंपनीत कार्यरत असून,  स्नेहल या गृहिणी आहेत. यंदा कन्या सृष्टी हिचा ५ वा वाढदिवस सर्व प्रकारचा बडेजाव टाळत त्यांनी अनाथ महिला हिंदू महिलाश्रमातील मुलींसोबत साजरा केला.  सृष्टीदेखील मुलींमध्ये छान रमून गेली. सृष्टीचा जन्म पर्यावरणदिनीचा.  तो आगळ्या पद्धतीने साजरा करण्याकडे कदम कुटुंबियांचा भर असतो. या वर्षी आपल्या कृतीतून त्यांनी समाजाला नवी दृष्टी देण्याचाच प्रयत्न केला आहे.
  राहुल कदम यांचे वडील जयवंत कदम हे निवृत्त पोलीस आहेत. राहुल यांनी दुष्काळग्रस्तांना मदत करण्यापासून विविध सामाजिक कामांमध्ये नेहमीच खारीचा वाटा उचलला आहे. त्यांचे काम आयटी क्षेत्राबरोबरच सर्वच क्षेत्रातील मंडळींकरिता ‘दिशा’दर्शक आहे.

Related posts: