|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Top News » काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक सुरू

काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक सुरू 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकरिणीची बैठक सुरू झाली आहे. 10जनपथवर ही बैठक सुरू असून, या बैठकीला काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी,माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम,गुलाम नबी आझाद, जनार्दन द्विवेदी, अंबिका सोनी आणि कार्यकारिणी समिती सदस्य उपस्थित आहेत.

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक हा या बैठकीचा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय देशातील बदलेली राजकीय परिस्थिती आणि विरोधी पक्षांमध्ये एकजूट कशी निर्माण केली जाऊ शकते, या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, असे सांगितले जात आहे.

 

Related posts: