|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » मान्सून पावसाची अजूनही प्रतीक्षा दोन दिवसात आगमन शक्य

मान्सून पावसाची अजूनही प्रतीक्षा दोन दिवसात आगमन शक्य 

पुणे / प्रतिनिधी

नैर्त्रुत्य मोसमी पावसाची वाटचाल मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, केरळ व तामिळनाडूच्या उर्वरित भागात, कर्नाटक किनारपट्टीच्या व दक्षिण अंतर्गत कर्नाटकाच्या बहुतांश भागात, रायलसीमाच्या व आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या काही भागात आणि मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात झाली आहे. पुढील तीन ते चार दिवसात मान्सूनची वाटचाल त्रिपुराचा उर्वरित भाग, आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगालमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तसेच येत्या दोन दिवसांत मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात होईल असा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, पुढील 48 तासांत कोकण-गोव्यात जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्यातील उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास होते. गेल्या 24 तासात मराठवाडय़ात बऱयाच ठिकाणी, कोकण-गोवा व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. राज्यात सर्वांत जास्त कमाल तापमान मालेगाव येथे 42.8 सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.

राज्यात बुधवारी औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी, तुळजापूर, बार्शी, महाबळेश्वर, सोलापूर, देवगड, मालवण, गुहागर, रत्नागिरी, वेंगुर्ला, दापोली, गुहागर, म्हापसा, हरणे, जळगाव, ओझर, गगनबावडा, लातूर, जिंतूर, मालेगाव, मलकापूरसह राज्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस झाला. उस्मानाबादमधील उमरगा तालुक्यात बुधवारी दोन तासांत तब्बल 102 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Related posts: