|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मडगाव पालिका कर्मचारी संघटणेत फुट घालणाऱयाची हकालपट्टी करणार

मडगाव पालिका कर्मचारी संघटणेत फुट घालणाऱयाची हकालपट्टी करणार 

प्रतिनिधी/ मडगाव

Aमडगाव नगरपालिकेची कर्मचारी संघटणा मजबूत आहे. तरी सुद्धा काही घटक संघटणेत फुट घालून वेगळी संघटना स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याची संघटणेतून हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती काल पत्रकार परिषदेत देण्यात आली.

गोवा नगरपालिका कर्मचारी संघटणेशी मडगाव पालिकेची कर्मचारी संघटना संलग्न आहे. मडगाव पालिका कर्मचारी संघटणा गेली 22 वर्षे कार्यरत असून कर्मचाऱयांच्या मागण्या पुढे नेण्याबरोबरच समस्या सोडविण्यास प्राधान्य दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली. संघटणेची सर्व साधारण सभा 15 जून 2017 रोजी बोलावण्यात आली असून त्यात नव्या समितीची अधिकृत निवड केली जाणार आहे. ही समिती 2019 पर्यंत कार्यरत राहील.

चार जणांची होणार हकालपट्टी

मडगाव पालिका कर्मचारी संघटणेचा कारभार सुरळीत चालू असताना त्यात फुट घालू पाहणाऱया सफाई विभागाचे निरीक्षक विराज आराबेकर, संजय सांगेलकर, राजू माडेकर व संदीप खानापूरकर यांची हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. हे चार ही जण वेगळी संघटना उभी करण्यासाठी कर्मचाऱयावर दबाव टाकत असून त्यांनी सहय़ाची मोहिम सुरू केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

विराज आराबेकर यांनी यापूर्वी एकदा संघटणेला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर तो पुन्हा संघटणेचा सदस्य झाला. त्याच बरोबर अन्य 37 कर्मचाऱयांनी पण संघटणेला सोडचिठ्ठी दिली होती. तेही पुन्हा सदस्य झाले होते. आत्ता पुन्हा संघटणेच्या विरोधात कारवाया सुरू झाल्याने कारवाईचा मार्ग पत्करला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले।

संघटणेचा सर्व हिशेब व्यवस्थित असून कामगार आयुक्तांना दर वर्षी ऑडिटेड अहवाल सादर केला जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मात्र, भलतीच विधाने करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी संघटणेवर त्याचा काहीच परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले.

या पत्रकार परिषदेला गोवा पालिका कामगार संघटणेचे अध्यक्ष केशव प्रभू, सरचिटणीस अनिल शिरोडकर तसेच मडगाव पालिका कर्मचारी संघटणेचे अध्यक्ष कॉन्सेसांव मिरांडा उपस्थित होते.

 

Related posts: