|Monday, January 20, 2020
You are here: Home » Top News » सीमारेषेवर दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न, चकमकीत 2 जवान जखमी

सीमारेषेवर दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न, चकमकीत 2 जवान जखमी 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू काश्मीरमधील उरी परिसरात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांकडून पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.

लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, आताही दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे.याआधी जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिह्यात नियंत्रण रेषेजवळ माछिल सेक्टर परिसरात भारतीय लष्कराने घुसखोरीचा मोठा कट उधळत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. या दहशतवाद्यांकडील मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. श्रीनगर येथे लष्कराचे प्रवक्ते राजे कालिया यांनी सांगितले की, ‘मंगळवारी रात्री दहशतवाद्यांचा एक गट नियंत्रण रेषा पार करून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे गस्तीवरील जवानांनी पाहिले. त्यानंतर जवानांनी या दहशतवाद्यांविरोधात कारवाईस सुरूवात केली.

 

Related posts: