|Saturday, December 14, 2019
You are here: Home » leadingnews » दहावीतही कोकणच ‘बाहुबली’

दहावीतही कोकणच ‘बाहुबली’ 

ऑनलाईन टीम / पुणे :

राज्य माध्यमिक शिक्षण मंडाळच्या दहावी परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून दहावीच्या निकालातही कोकण विभागाने बाजी मारली आहे. राज्याच्या निकाल 84.74 टक्के लागला आहे.

आज दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. यंदा 16 लाख 50हजार 499 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती त्यापैकी 16लाख 44 हजार 16 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा 96.18 टक्के निकाल लागला असून यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. नेहमीप्रमाणे याही परिक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 91.46 टक्के तर मुलांचा निकाल 86.51 टक्के लागला आहे. या वर्षी दहावीचा निकाल 0.82 टक्क्यांनी घसरला आहे. 18 जुलैला अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरिक्षा घेण्यात येणार आहे .तर 24 जूनला दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिल्या जाणार आहेत.

निकालाची विभागवार टक्केवारी :-

कोकण: 96.18%
कोल्हापूर: 93.59%
पुणे: 91.95%
मुंबई: 90.09%
औरंगाबाद: 88.15%
नाशिक : 87.76%
लातूर 85.22%
अमरावती: 84.99%
नागपूर: 83.67%

Related posts: