|Saturday, December 14, 2019
You are here: Home » leadingnews » 23 जूनला जाहीर होणार एनडीएचा राष्ट्रपतिपदाचा उमेदवार

23 जूनला जाहीर होणार एनडीएचा राष्ट्रपतिपदाचा उमेदवार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांच्या बैठकीत राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. येत्या 23 जूनला राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

एनडीएकडून राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. मात्र, भाजपच्या या बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाली असून, 23 जूनला राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यात आली आहे. या पदाच्या उमेदवारासाठी विरोधी पक्षानेही कंबर कसली आहे. राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, संयुक्त जनता दलाचे शरद यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव, सीपीएमचे सीताराम येच्युरी या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे.

Related posts: