|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पंढरपूर बंद : गवळी समाजाचा मोर्चा

पंढरपूर बंद : गवळी समाजाचा मोर्चा 

पंढरपूर / प्रतिनिधी

चंद्रभागेमध्ये पडलेल्या वाळूच्या खड्डय़ात बुडून चार चिमुकल्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आक्रमक झालेल्या गवळी समाजाने विविध संघटनांच्या पाEिठब्यासह प्रांताधिकारी कार्यालयावर बुधवारी भव्य मोर्चा काढला. यामधे मोठया संख्येने गवळी समाज, महीला, विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी यांनी महसुल प्रशासनाचा  निषेध केला.

सकाळी अकराच्या सुमारास येथील नंदकिशोर मंदिरापासून मोर्चा निघाला. त्यानंतर हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर येउन धडकला होता.

    या मोर्चामधे गवळी समाजातील तरूण तसेच वयोवृध्द व्यक्ती यांच्यासह कॉग्रेस, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, शिवसेना, रामोशी समाज, महर्षि वाल्मिकी संघ, वारकरी पाईक संघटना, पश्चिमव्दार व्यापारी संघटना, कोळी समाज, विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, यशवंत सेना, छावा संघटना आदि विविध प्रकारच्या संघटना यामधे सहभागी झाल्या होत्या. निषेध असो निषेध असो महसुल प्रशासनाचा निषेध असो, महसुली अधिका-यांवर कारवाई झालीच पाहीजे … अशा घोषणा देत मोर्चाने शहर दणाणून सोडत प्रांताधिकारी कार्यालयावर गेला. याठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या पदाधिकारी यांनी मनोगते व्यक्त करीत सदरच्या मोर्चाला पाठींबा दिला.

मोर्चाच्या वतीने तसेच गवळी समाजाच्या वतीने शहापूरकर आणि जुमाळे कुंटुबियांच्या हातून महसुली अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधांचा गुन्हा दाखल करावा, वाळू चोरांवर कारवाई, शहापूरकर आणि जुमाळे कुंटुबियांना सरकारी मदत, कायमस्वरूपी लाईफ्ढगार्ड, वाळू उपसा बंद करणे, मंदिर समितीकडून स्नानाला गेलेल्या भाविकाचा विमा उतरवणे आदि प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या.

   याप्रसंगी या मोर्चाला प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात तहसिलदार मधुसूदन बर्गे सामोरे गेले. यावेळी त्यांनी निवेदन स्वीकारून शासनाने मदतीसाठी अहवाल सरकारकडे पाठवून दिला आहे. याबाबत योग्य ती कारवाई तसेच चंद्रभागे संदर्भात काळजी घेण्यात येणार असल्यांचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी आक्रमक झालेल्या गवळी समाजाने तहसिलदार यांच्यासमोर महसुली प्रशासनाचा निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर मोर्चा याठिकाणीच विसर्जीत करण्यात आला.

     चार चिमुकल्यांच्या मृत्यूबाबत निघालेल्या मोर्चासाठी पंढरपूरकरांनी पंढरपूर काहीकाळ बंद ठेवले होते. यामधे मंदिर परिसर, महाव्दार, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड आदि भागतील व्यापा-यांनी या बालकांना श्रध्दांजली म्हणून संपूर्ण बंद ठेवत मोर्चाला पाठींबा दिला. मोठया संख्येने एकवटलेला गवळी समाज आणि यामधे विविध संघटनाचे सहभागी झालेले पदाधिकारी यांच्यामधे काही वाळू तस्कर आणि वाळू चोर देखिल महसुली प्रशानाचा निषेध करण्यात अग्रेसर होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया या उंचावलेल्या पहावयास मिळाल्या.

मोर्चात झाली ‘ श्रध्दांजली ’

   भजनदास चौकांतील नंदकिशोर मंदिरातून मोर्चा निघाला. आणि महाव्दार चौकाजवळ मोर्चा आला. यावेळी शहापूरकर आणि जुमाळे यांच्या घरानजीक मोर्चा आल्यावर. या ठिकाणी काही काळांसाठी मोर्चा स्तब्ध झाला. आणि याठिकाणी मृत पावलेल्या चिमुकल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. आणि पुन्हा एकदा मोर्चा हा मार्गस्थ झाला.

Related posts: