|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट, दोघांचा मृत्यू

पुण्यात ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट, दोघांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / पुणे  :

खडकीच्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये आज सकाळी स्फोट झाला. या स्फोटात दोन कर्मचाऱयांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये आज सकाळी 9.30 सुमारास दारूगोळय़ाचा स्फोट झाला. दोन स्फोटक वस्तू हाताळत असताना व एका जागेवरून दुसऱया जागेवर वाहून नेत असताना या दोन्ही वस्तूची टक्कर झाली आणि हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा स्फोटइतका भीषण होता की, दोन कामगारांचा यात जागीच मृत्यू झाला.तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.