|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » 21 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात सार्वत्रिक माफी

21 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात सार्वत्रिक माफी 

अवैध बंदुकधाऱयांना दिलासा, देशात खासगी शस्त्रास्त्रांची संख्या घटविण्याचा उद्देश

वृत्तसंस्था/ कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया)

अवैध बंदूकधाऱयांना शरणागती पत्करण्यापूर्वी सार्वत्रिक माफी देण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियन शासनाने घेतला आहे. बंदुकावर आधारित गुन्हे वाढल्यामुळे त्याला तोडगा म्हणून ऑस्ट्रेलियन फेडरलम यांनी शुक्रवारी घोषणा केली. अवैध बंदुका हवाली करणाऱयांना तीन महिन्यांच्या काळात माफी दिली जाणार आहे. 1996 पासून ही दुसरी माफी आहे. त्यावेळी टास्मानियामध्ये एकाच बंदूकधाऱयाने 35 जणांचे बळी घेतले होते. न्यायमंत्री मायकेल कीनन यांनी समाजात अवैध बंदुका कमी करण्याचा उद्देश नवीन सार्वत्रिक माफीमागे असल्याचे सांगितले. इस्लामी दहशतवादाने चालविलेल्या हिंसाचारामुळे नवीन सुरक्षाविषयक माफी असल्याचे कीन यांच्याकडून सांगण्यात आले.

सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या दहशतवादी कृत्यांची संख्य़ा 5 वर गेली आहे. त्यातील तीन प्रसंगात अवैध बंदुकांचा वापर असून दोन घटनांमध्ये सुरेमारी करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याने अवैध बंदुकाकमी करण्याचा निर्णय घेणे आवश्यक ठरले, असे कीन म्हणाले. यामुळे हिंसाचारी गुन्हेगारांच्या हातात ही शस्त्रे पडण्याचा धोका कमी होईल, असे त्यांनी सांगितले. 1996 च्या सार्वत्रिक माफीमध्ये अवैध शस्त्रांची रक्कम परत देण्यासंबंधी तरतूद होती. पोर्ट ऑर्थर हिंसाचरी प्रकरणामुळे राज्यांना अवैध शस्त्रावर मर्यादा घालून 7 लाख अवैध शस्त्रांबाबत शरणागती पत्करण्याचा निर्णय घ्यावा लागला. ऑस्ट्रेलियन ब्यूरो ऑफ स्टेटिटिक्सच्या माहितीप्रमाणे ऑस्ट्रेलियात 13 दशलक्ष वैध बंदुका आहेत. मिलिटरी पद्धतीच्या तसेच सेमी ऍटोमेटिक बंदुका जनतेच्या मालकीपासून दूर ठेवण्यात आल्या आहेत. 24 दशलक्ष ऑस्ट्रेलियनांमध्ये 2.89 दशलक्ष केंद्रीकृत बंदुका आहेत. याचा अर्थ येत्या पाच वर्षात 9.3 टक्के शस्त्रांची वाढ झाली. ऑस्ट्रेलियन क्रिमिनल इंटेलिजन्स आयोगाच्या अहवालाप्रमाणे देशात 6 लाख अवैध बंदुका आहेत. 1996 पूर्वी अवैध शस्त्रांना बायबॅक काळामध्ये नोंद झालेली नव्हती, असे आढळले आहे.

मध्यपूर्व गुन्हेगारी टोळ्यांकडून अवैध बंदुकांची बाजारपेठ अंशत चालविली जाते, अवैध मोटारसायकल क्लब्ज, तसेच अंमली पदार्थांच्या वस्तूसारखाच हा प्रकार आहे. अमेरिकेत शस्त्रे सहजसाध्य आहेत. ऑस्ट्रेलियासारख्या देशांना ती गुप्तपणे पाठविण्यात येतात. सिडने युनिव्हर्सिटी गन पॉलिसीचे पृथक्करणकार यांच्या मताप्रमाणे बंदुकीच्या वैध मालकाकडून किंवा गुन्हे गारांकडून किंमत ठरविलेल्या अर्थशून्य बंदुका सार्वत्रिक माफीमुळे मिळू शकतील, असे सांगण्यात आले आहे.

Related posts: