|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जीएसटीबाबत व्यापाऱयांत गैरसमज नको

जीएसटीबाबत व्यापाऱयांत गैरसमज नको 

बेळगाव / प्रतिनिधी

जीएसटीचा व्यापाऱयांनी गोंधळ करून घेतल्याने त्यांना समजण्यास कठीण होत आहे. ही प्रणाली पूर्णपणे ऑनलाईन आहे. व्यापाऱयांनी कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नये. माहिती उपलब्ध होत नसेल तर साहाय्यता डेस्कची मदत घ्यावी, असे प्रतिपादन कमर्शियल टॅक्स विभागाचे जॉईन्ट कमिशनर मिर्झा अझमत उल्ला यांनी दिले.

दि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियाच्या बेळगाव शाखेतर्फे व्यापारीवर्गाच्या मदतीसाठी जीएसटी साहाय्यता डेस्कच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी केंदीय अबकारी विभागाचे जॉईन्ट कमिशनर एस. के. मोहन्तो, संघटनेचे अध्यक्ष चेतन चौगुले व खजिनदार प्रवीण घाळी उपस्थित होते.

देशभरात 80 लाखांहून अधिक जीएसटीच्या खाली येणारे व्यापारी आहेत. त्यांनी एकाच वेळी वेबसाईटवर नावनोंदणी केल्यास सर्व्हर डाऊनचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील काही व्यापाऱयांना याचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे सकाळी व संध्याकाळच्या सत्रात नावनोंदणी करावी, असे त्यांनी सांगितले.

अबकारी विभागाचे जॉईन्ट कमिशनर एस. के. मोहन्तो म्हणाले, जीएसटी येत्या जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. याची तयारी पूर्ण झाली असून व्यापाऱयांची नोंदणीही करण्यात आली आहे. व्यापाऱयांना सर्व कर एकाच प्रणालीखाली आल्याने याचा फायदा होणार आहे. तसेच एका महिन्यात एकच रिटर्न भरावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हा हेल्पडेस्क व्यापाऱयांच्या मदतीसाठी 16 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत खुला असणार आहे. जीएसटीचा अभ्यास केलेले तज्ञ चार्टर्ड अकौंटंट्स मार्गदर्शन करणार आहेत. याचा व्यापाऱयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts: