|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » के. एम. बागवान यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

के. एम. बागवान यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 कृषि विभागातील तांत्रीक कर्मचारी के. एम. बागवान हे सेवानिवृत्तीनिमित्त  जिल्हा सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. संघटनेच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी यावेळी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

उपस्थित मान्यवरांनी यावेळी, जिह्याचे उपाध्यक्ष, संपर्क प्रमुख व प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम करणारे व सर्वांचे आवडते कर्मचारी अशा भावना व्यक्त केल्या. तसेच त्यांच्या सहकार्याच्या भावनेमुळे सामाजिक कार्याचा ठसा कार्यामधून दिसून येतो. आंदोलने, निदर्शने, संप, मोर्चे आदींमध्ये त्यांनी आपले कार्य यशस्वीपणे पार पाडले असल्याचे आदींनी मनोगतात व्यक्त केले. यावेळी कार्याध्यक्ष प्रकाश शेलार, सरचिटणीस संजय क्षीरसागर, सत्काश्र मुर्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वसंतराव डावरे, कोषाध्यक्ष शांताराम पाटील, श्रीमंती पाटील, शकुंतला चौगुले, संजीवनी दळवी, ज्ञानेश्वर मुठे, महेश सावंत, सतिश ढेकळे, सुरेश पानारी, उदय लेंबोरे, विलास कुरणे, सुनिल देसाई, बी. एस. खोत, यु. एस. पाटील आदी उपस्थित होते.