|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » व्यंकय्या नायडूंच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता

व्यंकय्या नायडूंच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता 

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था :

कर्जमाफी आता फॅशन ठरली असून कर्ज माफ करणे समस्येवरील अंतिम उपाय नव्हे असे केंद्रीय शहरीविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. नायडूंचे हे वक्तव्य मागील काही दिवसांमध्ये राज्यांद्वारे शेतकऱयांचे कर्ज माफ करण्याच्या आल्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरते. वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता पाहताच नायडूंनी याप्रकरणी नंतर स्पष्टीकरण देखील दिले. बुधवारीच कर्नाटकने देखील शेतकऱयांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती.

कर्जमाफी आता फॅशन झाली असून हा निर्णय केवळ अत्यंत अवघड स्थितीतच घेतला जावा. हा निर्णय उपाय नाही, परंतु शेतकऱयांची काळजी घ्यावी लागणार आहे. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाबने आधीच कर्जमाफीची घोषणा केली आहे. कर्नाटकने प्रत्येक शेतकऱयाचे 50 हजार रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे राज्यांच्या तिजोरीवर भार वाढेल असे नायडूंनी गुरुवारी म्हटले आहे. महाराष्ट्रात शेतकऱयांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली होती.

Related posts: