|Sunday, November 17, 2019
You are here: Home » leadingnews » राज्यातील शेतकऱयांना 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर

राज्यातील शेतकऱयांना 34 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यातील शेतकऱयांना 34 हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱया शेतकऱयांना कमाल 25 हजारांपर्यंत अनुदान देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारने या योजनेला छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना असे नाव दिले आहे.

शेतकऱयांच्या कर्जमाफीचा मुद्दा राज्यभर गाजत असताना शेतकऱयांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरुन कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. कर्जमाफीच्या मुद्यावरुन मंत्रिगटाची उच्चाधिकार, सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य नेत्यांची भेट घेतली.

त्यानंतर राज्य सरकारच्या झालेल्या बैठकीत शेतकऱयांचे दीड लाखांपर्यंतचे कृषीकर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ राज्यातील 89 लाख शेतकऱयांना होणार आहे.

तसेच ज्या शेतकऱयांनी कृषिकर्ज नियमितपणे भरले, अशा शेतकऱयांना 25 टक्के आणि कमाल 25 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान जाहीर करण्यात आले. या सर्व शेतकऱयांना 30 जूनपर्यंत अनुदान थेट बँक खात्यात जमा होणार आहे.

 

Related posts: