|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » leadingnews » उपराष्ट्रपती निवडणूक ; 5 ऑगस्टला मतदान होणार

उपराष्ट्रपती निवडणूक ; 5 ऑगस्टला मतदान होणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

उपराष्ट्रपतिपदासाठी मतदान 5 ऑगस्टला होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी सांगितले.

या निवडणुकीची अधिसूचना 4 जुलैला जारी करण्यात येणार आहे. 18 जुलै ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या पदाचा कार्यकाळ येत्या 10 ऑगस्टला संपत आहे. त्यामुळे रिक्त होणाऱया या पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. दरम्यान, उपराष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related posts: