|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » ‘सागररत्न’ जागतिक स्तरावर पसरणार पंख!

‘सागररत्न’ जागतिक स्तरावर पसरणार पंख! 

अमेरिका, ग्रेट ब्रिटन, पॅनडातही दुकाने स्थापणार   आंतरराष्ट्रीय ब्रॅन्ड्सबरोबर होणार टक्कर

प्रतिनिधी/ मुंबई

जागतिक स्तरावर ‘गो-व्हेजीटेरियन’ चळवळीला मिळत असलेली लोकप्रियता पाहता ‘सागररत्न’ या स्थानिक पातळीवर लोकप्रिय असलेल्या रेस्टॉरंट साखळीची भोजनालये आता विदेशांतही सुरू होत आहेत. अमेरिका, गेट ब्रिटन तसेच पॅनडा येथे ही
हॉटेल्स सुरू होणार आहेत. ‘सागररत्न’ आणि ‘स्वागत’ फेम जयराम बनान यांचे पुत्र रोशन बनान यांनी ही घोषणा केली.

इंडिया इक्विटी पार्टनर्स (आयईपी) या खाजगी इक्विटी फंडाला 2011 मध्ये 132 कोटी रुपयांना विकलेली 77 टक्के भागीदारी त्यांनी पुन्हा विकत घेतली आहे. ‘आम्ही विदेशी बाजारपेठेत फ्रँन्चायजी मॉडेलच्या माध्यमातून प्रवेश करत आहोत,’ असेही ओशियन पर्ल हॉटेल्सचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या रोशन बनान यांनी म्हटले आहे. ओशियन पर्ल हॉटेल्स ही कंपनी ‘सागररत्न’ आणि ‘स्वागत’ या
रेस्टॉरंटस्व्यतिरिक्त हॉटेल्सची साखळीही चालवते.

सध्या हा समूह 90 ‘सागररत्न’ स्टोअर्स चालवतो. कंपनीच्या मालकीचे स्टोअर्स आणि फ्रँन्चायजी पद्धत अशा दुहेरी माध्यमातून कंपनीने येत्या तीन वर्षांत हा आकडा तिप्पट करण्याचे ठरविले आहे. योगगुरु आणि आघाडीचे उद्योजक रामदेव बाबा यांनीही पतंजली ब्रँडखाली शाकाहारी भोजनालयांची साखळी दाखल करण्यामध्ये रस दाखवला आहे. मॅकडोनाल्ड्स, केएफसी आणि सबवे या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या धर्तीवर आणि त्यांच्या स्पर्धेत ही साखळी निर्माण करायची आहे. ‘शाकाहारी भोजनाचे जे आरोग्यपूर्ण फायदे आहेत ते लक्षात आल्याने आता लोकांमध्ये या भोजनाची मागणी वाढत आहे. हा अनुभव मी विदेशी फिरत असतानाही घेतला आहे. पतंजलीलाही आपली रेस्टॉरंट्स या बाजारपेठेपर्यंत न्यायाची आहेत,’ असे ते म्हणाले होते.

वेगन सोसायटीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, ग्रेट ब्रिटनमध्ये शाकाहारींची संख्या गेल्या दहा वर्षांमध्ये 360 टक्क्यांनी वाढली आहे. पूर्वी ही बाजारपेठ मांसाहार सेवन करणाऱयांची मानली जायची. मात्र आता त्यात घट झाली.

Related posts: