|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » घोटाळय़ाने बँकांना 16,770 कोटीचा फटका

घोटाळय़ाने बँकांना 16,770 कोटीचा फटका 

गेल्या पाच वर्षात 72 टक्क्यांनी वाढ : कर्जामुळे फसवणुकीत वाढ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2016-17 आर्थिक वर्षांत बँक क्षेत्राला फसवणुकीमुळे 16,770 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. गेल्या पाच वर्षांत यात 72 टक्क्यांनी वाढ झाल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून समजते.

गेल्या 5 वर्षात आर्थिक क्षेत्रात घोटाळा संख्या आणि आकारमानाबाबत वाढ झाली. या कालावधीत घोटाळय़ांची संख्या 19.6 टक्क्यांनी वाढत 4,235 वरून 5,064 वर पोहोचली, असे आरबीआयच्या द्विवार्षिक आर्थिक स्थिरता अहवालात म्हटले. गेल्या काही वर्षात व्यावसायिक बँका आणि आर्थिक सेवा क्षेत्रातील घोटाळय़ांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने धोका व्यक्त करण्यात आला आहे.

पाच वर्षांपूर्वी घोटाळय़ांचा आकार 9,750 कोटी रुपये होता. आता यात तब्बल 72 टक्क्यांनी वाढ होत 16,770 कोटी रुपयांवर पोहोचला. या घोटाळय़ांमध्ये सर्वाधिक 86 टक्के वाढ 2016-17 मध्ये झाली. कर्जामुळे ही संख्या वाढल्याचे म्हणण्यात आले.

प्रस्तावित पातळीवर योग्य प्रमाणात पतपुरवठा करण्यात न आल्याने, या पतपुरवठय़ावर आणि एबिटडावर नियंत्रण नसणे, सुरक्षासंबंधी कोणतीही देखभाल नसणे आणि अतिकिंमत आकारण्याने हे घोटाळे वाढत आहेत, असे नमूद करण्यात आले. सायबर घोटाळय़ाबाबत शंका उपस्थित करण्यात आली. कोणतीही सिस्टम ही सुरक्षित समजली जात नाही, जोपर्यंत संपूर्ण इकोसिस्टम सुरक्षित होत नाही. पूर्णपणे सिस्टम सुधारणे हे या क्षेत्रासमोरील आव्हान आहे. भविष्यात सायबर हल्ले होता नये यासाठी प्रमुख बँकांनी सायबर सुरक्षतेचा आढावा घ्यावा असे म्हणण्यात आले.